एका जीआरने प्रश्न सुटणार नाहीत, शिंदेंचा मराठा समाजाला सबुरीचा सल्ला

हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याच्या निर्णयाचा मराठा समाजाला नक्की फायदा होईल, पण एका जीआरमुळे मराठय़ांचे प्रश्न सुटणार नाहीत, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

मराठा आरक्षणाबाबत सरकार टप्प्याटप्प्याने इतर गोष्टी करणार आहे. बरेच काही काम बाकी आहे. काही गोष्टी क्लिष्ट आणि कायदेशीर अडचणीच्या आहेत. कोणत्याही समाजाची फसवणूक होऊ नये ही सरकारची भूमिका आहे. सरकारने काढलेल्या जीआरमुळे अन्य कोणत्याही समाजाचे नुकसान होणार नाही, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

या शासन निर्णयामुळे मराठा समाजाला जात प्रमाणपत्र मिळण्याची पद्धत सोपी व सुटसुटीत होईल. नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र दिले जाईल, असे शिंदे म्हणाले.