
आंध्रप्रदेशच्या विजयवाडा परिसरात रविवारी कोरोना सेंटर असलेल्या हॉटेलला भीषण आग लागली. यात 10 जणांचा होरपळून मृत्यू झाला. दुर्घटना घडली त्यावेळी हॉटेलमध्ये कोरोनाचे 40 रुग्ण, तर आरोग्य खात्याचे 10 कर्मचारी होते. अहमदाबादच्या कोरोना रुग्णालयाला आग लागून तीन दिवस उलटत नाही तोच हे कोरोना सेंटर आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने खळबळ उडाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी या दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केले.
एलुरु रोडकरील स्कर्ण पॅलेस हॉटेलमध्ये रविवारी पहाटे पाचच्या सुमारास ही आग लागली. हे हॉटेल कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी रमेश हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने भाडय़ाने घेतले होते. शॉर्टसर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीच्या धुरात श्वास गुदमरल्याने बहुतांशी लोकांचा मृत्यू झाला. दुर्घटनेनंतर तातडीने सर्क कोरोनाग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलकण्यात आले. याआधी 6 ऑगस्टला अहमदाबादच्या श्रेय कोविड हॉस्पीटलला आग लागली होती. त्यात आठ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला होता. तेथील पोलिसांनी हॉस्पीटलच्या ट्रस्टी आणि एका कर्मचाऱयाला ताब्यात घेतले होते.

























































