हैद्राबाद मार्ग बंद, चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहर जलमय

चंद्रपूरहून हैद्राबादकडे जाणारा बंद झालाय. या आंतरराज्यीय मार्गावर लक्कड कोट जवळ नाल्याला पूर आल्याने हा मार्ग बंद झालाय. बुधवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने राजुरा शहर जलमय झाले आहे. मार्गावर पाणी आल्याने राजुरा ते गडचांदूर मार्ग बंद झाला आहे, तर रामपूर-गोवरी मार्गावरही पाणी आल्याने हा मार्ग सुद्धा ठप्प झाला आहे.

पोलीस व महसूल प्रशासन या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले असून राजुरा शहरातील आमराई वार्ड, साईनगर, रामपूर आदी भागात पाणी साचले आहे. गडचांदूर मार्गावरील भवानी माता मंदिरजवळील नाल्यावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक खोळंबली आहे. राजुरा शहरातील रामपूर भागात अनेक दुकाने पाण्याखाली गेल्याने व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आणखी पावसाची शक्यता असल्याने पोलीस व महसूल प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे. वाहतुकीत फसलेल्या सर्व सामान्य जनतेचे मात्र चांगलेच बेहाल झाले असल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

आपली प्रतिक्रिया द्या