महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या समाजकल्याण अधिकारी आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा या नियोजित दिवशीच होणार आहेत. त्यात कोणताही बदल होणार नाही असे एमपीएससीने एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. समाजकल्याण अधिकारी पदासाठी 18 ऑगस्ट तर नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 25 ऑगस्टला होणार आहे. मात्र, आयबीपीएस क्लार्क परीक्षा 25 ऑगस्ट रोजी होणार असल्याने राज्यातील लाखो विद्यार्थी या परीक्षेला मुकणार आहेत. आयबीपीएस क्लर्क परीक्षेचे वेळापत्रक जानेवारी महिन्यातच जाहीर करण्यात आले होते. तर एमपीएससीने त्यांच्या पूर्व परीक्षेची तारीख या आधी दोन वेळा बदलली. परीक्षेची तारीख तिसऱ्यांदा ठरवतानाही एमपीएससीने घोळ घातला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.