
जगविख्यात फुटबॉलपटू आणि अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनल मेस्सी तीन दिवसीय हिंदुस्थान दौऱ्यावर आहे. कोलकाता आणि मुंबईतील चाहत्यांना भेटल्यानंतर तो आता दिल्लीमध्ये पोहोचला आहे. दिल्लीच्या अरून जेटली स्टेडियमवर लिओनल मेस्सीला पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी त्याला भेटण्यासाठी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, ICC अध्यक्ष जय शहांसह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान जय शहा यांनी मेस्सीला खास वस्तू भेट म्हणून दिल्या आहेत.
लिओनल मेस्सीला टी-20 वर्ल्ड कपचं तिकीट, जर्सी आणि एक खास बॅट भेट#LionelMessiinindia #Delhi #TeamIndia pic.twitter.com/h14cdKDaDO
— Saamana Online (@SaamanaOnline) December 15, 2025
क्रिकेटसाठी प्रसिद्ध असणारं दिल्लीच अरुण जेटली स्टेडियम आज (15 डिसेंबर 2025) मेस्सीमय झालं होतं. मेस्सीच्या नावाचा जयघोष संबंध स्टेडियममध्ये पाहायला मिळाला. लिओनल मेस्सीने यावेळी युवा खेळाडूंशी संवाध साधला, तसेच स्टेडियममध्ये उपस्थित चाहत्यांना मेस्सीने भेट स्वरुपात फुटबॉल दिले. यावेळी जय शहांनी मेस्सीला आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची जर्सी भेट म्हणून दिली. तसेच ऑटोग्राफ केलेली एक खास बॅट, आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी त्याला आमंत्रित केले असून स्पर्धेच तिकीटही त्याला दिलं आहे. त्याच बरोबर जय शहा यांनी मेस्सीचे सहकारी सुआरेजला 7 नंबर आणि डी पॉलला 9 नंबरची जर्सी भेट म्हणून दिली.





























































