आयसीसी वन डे रँकिंग जाहीर; विराट, बुमराह नंबर वन

679

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली व वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनीआयसीसीच्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीत अनुक्रमे फलंदाजी आणि गोलंदाजीमधीलनंबर वनचे सिंहासन कायम राखले.

मंगळवारी जाहीर झालेल्या नव्या एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीनुसार विराट कोहली 895 गुणांसह आपल्या अव्वल स्थानावर कायम आहे. याचबरोबरटीम इंडियाचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्मा 863 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आला आहे. पाकिस्तानचा बाबर आझम, दक्षिण आफ्रिकेचा फाफ डू प्लेसिस व न्यूझीलंडचा रॉस टेलर अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या स्थानावर कायम आहेत.

गोलंदाजी क्रमवारीत जसप्रीत बुमराहने 797 गुणांसह आपलेनंबर वनचे सिंहासन शाबूत ठेवले आहे. नव्या क्रमवारीत टॉप-10 मध्ये हिंदुस्थानचा एकमेव गोलंदाज आहे. न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट 740 गुणांसह दुसऱ्या स्थानावर असून अफगाणिस्तानचा मुजीब जदरान, दक्षिण आफ्रिकेचा कॅगिसो रबाडा व ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या स्थानावर आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या