‘आयसीसी’ सुरू करणार नव्या स्पर्धा; टी-20 चॅम्पियनशिप, वन डे चॅम्पियनशिप घेण्याची योजना

61

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आगामी काळात नव्या क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यासाठी योजना आखत आहे. 2023 ते 2031 या कालावधीत टी-20 चॅम्पियनशिप कप आणि वन डे इंटरनॅशनल चॅम्पियन्स कप या स्पर्धा आयोजित करण्याचा ‘आयसीसी’चा मानस आहे. मात्र यासंदर्भात ‘आयसीसी’ने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. ‘आयसीसी’च्या या नक्या स्पर्धांच्या आयोजनाला हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळासह काही देशांतील क्रिकेट बोर्डांकडून विरोध करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या