
सलामीचे सामने झुंज देत जिंकणारे टी-20 क्रिकेटचे डबल जगज्जेते इंग्लंड आणि वेस्ट इंडीज वानखेडेवर ‘क’ गटातून सुपर एटचा दावा मजबूत करण्यासाठी उद्या उतरणार आहेत. सलामीची लढत पाहता दोन्ही संघ तुल्यबळ आहेत आणि कोणताही संघ जिंकू शकतो.
वेस्ट इंडीजचा संघ स्कॉटलंडशी भिडला होता. अचानक वर्ल्ड कप खेळायला उतरलेल्या स्कॉटलंडने विंडीजला चांगलीच चुरस दिली. तसेच इंग्लंडला नेपाळने वानखेडेवर चांगलाच घाम पह्डला होता. अवघ्या 4 धावांनी नेपाळला हार मानावी लागली होती. सलामीवीर फिल सॉल्टचा अपवाद वगळता जोस बटलर, जेकेब बेथेल, हॅरी ब्रूक यांनी दमदार फलंदाजी केली. फक्त गोलंदाजीत ते काहीसे कमी पडले. सॅम करनने शेवटच्या षटकात लोकेश बामला यॉर्करवर रोखले नसते तर वानखेडेवर मुंबईकरांना खळबळजनक विजय पाहायला मिळाला असता. विंडीजविरुद्ध इंग्लिश गोलंदाज जोप्रा आर्चर, ल्युक वूडला आपल्या गोलंदाजीची धार दाखवावीच लागणार. नेपाळविरुद्धचा थरारक खेळ पाहता इंग्लंड दोन बदलांसह उतरण्याची शक्यता आहे.
दोन्ही संघांची ताकद फलंदाजी आहे, पण गोलंदाजीला आणखी मजबूत करून ते वानखेडेवर उतरतील. कारण जो मुंबई जिंकेल, त्याचा सुपर एटचा प्रवास अधिक सोपा होईल. या लढतीच्या निमित्ताने मुंबईकरांना आणखी एक थरारक सामना पाहायला मिळणार, हे कुणी नाकारू शकत नाही.
अंतिम संघ यातून निवडला जाईल
इंग्लंड ः हॅरी ब्रूक, जोप्रा आर्चर, टॉम बॅण्टन, जेकब बेथेल, जोस बटलर (यष्टिरक्षक), सॅम करन, लिआम डॉसन, बेन डकेट, विल जॅक्स, जॅमी ओव्हरटन, आदिल राशीद, रेहान अहमद, जॉश टंग, ल्युक वूड.
वेस्ट इंडीज ः शाय होप (यष्टिरक्षक), जॉन्सन, चार्ल्स, रोस्टन चेस, मॅथ्यू पर्ह्ड, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, अकिल होसेन, शामर जोसेफ, ब्रॅण्डन किंग, गुदाकेश मोती, रॉवमन पॉवेल, शेरफन रुदरपर्ह्ड, क्वेटिन सॅम्पसन, जेडेन सिल्स, रोमारिओ शेफर्ड.

























































