ICC T20 WC 2026 – झिम्बाब्वे-ओमान लढतीत उलथापालथीची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टी-20 विश्वचषक हा दुर्बल समजल्या जाणाऱ्या संघांचा ठरू शकतो का, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. सुरुवातीच्या सामन्यांनी त्याची नांदी दिली आहे. नेदरलँड्सने पाकिस्तानला धक्का देण्याच्या अगदी उंबरठय़ावर नेलं, तर अमेरिकेने हिंदुस्थानला चांगलंच अडचणीत टाकलं. आता कोलंबोच्या एसएससी मैदानावर लक्ष केंद्रीत झालं आहे, जिथे गट ब मधील महत्त्वाच्या सामन्यात ओमान आणि झिम्बाब्वे आमनेसामने येत आहेत.

ही लढत अधिकच रंगतदार ठरते. कारण अवघ्या चार दिवसांपूर्वी सराव सामन्यात ओमानने 187 धावांचं लक्ष्य चार विकेट राखून पार केलं होतं. त्याआधी त्यांनी श्रीलंका अ संघालाही पराभूत केलं. त्यामुळे आत्मविश्वासाने भरलेला ओमान झिम्बाब्वेसमोर पुन्हा आव्हान उभं करणार आहे. झिम्बाब्वेही प्रतिष्ठेसाठी पूर्ण ताकदीने उतरेल.

संभाव्य अंतिम संघ

झिम्बाब्वे – ब्रायन बेनेट, तडिवानाशे मारुमानी, ब्रॅण्डन टेलर (यष्टिरक्षक), सिपंदर रझा (कर्णधार), रायन बर्ल, टोनी मुन्योंगा, तशिंगा मुसेकिवा, ब्रॅड इव्हान्स, वेलिंग्टन मसकाझा, टिनोटेंडा मापोसा, रिचर्ड नगारावा.

ओमान – जतिंदर सिंग (कर्णधार), आमिर कलीम, हम्माद मिर्झा, करण सोनावळे, वसीम अली, विनायक शुक्ला (यष्टिरक्षक), जितेन रामनंदी, नदीम खान, शाह फैसल, शकील अहमद, जय ओडेद्री.