ICC Women’s T20 WC 2024 – महिला T20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा, वाचा कोण-कोण आहे संघात…

हिंदुस्थानने महिला T20 विश्वचषक 2024 साठी संघ जाहीर केला आहे. हरमनप्रीत कौर यावेळी हिंदुस्थानच्या कर्णधार पदाची धुरा सांभाळणार आहे. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील टीम इंडियामध्ये अनुभवी खेळाडूंसोबतच युवा खेळाडूंनाही संधी मिळाली आहे. महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा 3 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. हिंदुस्थानचा पहिला सामना न्यूझीलंडच्या महिला संघाशी आहे. हा सामना 4 ऑक्टोबरला होणार आहे.

टीम इंडियाने स्मृती मंधाना, शफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा यांना संधी दिली आहे. त्यांच्यासोबत जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष आणि यष्टिका भाटिया यांनाही संधी मिळाली आहे. पूजा वस्त्राकर, रेणुका सिंह, हेमलता, शोभना आणि राधा यादव यांनाही संधी देण्यात आली आहे. दरम्यान टीम इंडिया एकूण चार ग्रुप सामने खेळेल. यापैकी 3 सामने दुबईत तर एक सामना शारजाहमध्ये खेळवला जाणार आहे.

ICC महिला T20 विश्वचषक 2024 साठी टीम इंडियाचा संघ –

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, ऋचा घोष (विकेटकीपर), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), पूजा वस्त्राकर, अरुंधा रेड्डी , रेणुका सिंह ठाकूर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील, सजना सजीवन