जग विनाशाच्या जवळ… इतिहासात प्रथमच आइसलँडवरील बर्फाचा डोंगर गायब

4014

‘ग्लोबल वार्मिंग’ अर्थात वातावरण बदलाचा धोका आता हळूहळू आपला रंग दाखवू लागला आहे. इतिहासामध्ये पहिल्यांदाच आइसलँडवरील एक संपूर्ण डोंगर गायब झाला आहे. ओकजोकुल नावाचा हा बर्फाचा डोंगर (ग्लेशियर) गायब झाल्याने शास्त्रज्ञांनाही धक्का बसला आहे. ही धोक्याची घंटा असल्याचे मत शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

आइसलँडवरील बर्फाच्या डोंगराचे 1986 रोजी आणि आता 2019 रोजी घेतलेले फोटो समोर आले आहेत. ओकजोकुल ग्लेशियर विरघळून गेल्याने स्थानिकांनाही धक्का बसला आहे. गोल्बल वॉर्मिंगचा विरोध करण्यासाठी स्थानिकांना या ग्लेशियरचे अंतिम संस्कारही केले. विशेष म्हणजे आइसलँडचे पंतप्रधान कॅटरीन जकोबस्डोटिर, यूएन ह्यूमन राइट्स कमिश्नर मॅरी रॉबिनसन, संधोधक, विद्यार्थी आणि अन्य काही लोक देखील या अंतिम संस्कारामध्ये सहभागी झाले.

gleshier1

आइसलँडचे पंतप्रधान कॅटरीन यावेळी म्हणाले की, हा अंतिम संस्कार फक्त आइसलँडच्या लोकांसाठी नाही, तर जगभरातील लोकांसाठी प्रेरणादायक ठरेल. वातावरण बदलाचा हा एक फक्त नमुना असल्याचे ते म्हणाले. जग विनाशाच्या आणखी जवळ पोहोलत असल्याची प्रतिक्रिया तज्ज्ञांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या