छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांकडून आयडी ब्लास्ट; एक जवान शहीद, सात जवान जखमी

file photo

छत्तीसगडमधील सुकुमामध्ये नक्षलवाद्यांनी एक आयडी ब्लास्ट केला आहे. त्यात एक जवान शहीद झाला असून सात जवान जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री साडे आठच्या सुमारास सुकुमाजवळील अरवराज मेटा जंगलाजवळ नक्षलवाद्यांविरोधात एक ऑपरेशन राबवताना हा ब्लास्ट झाला. त्यात सीआरपीचे 8 जवान जखमी झाले. त्यांना तातडीने रायपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा उपचारादरम्यान एका जवानाचा मृत्यू झाला. या घटनेत कुठलीही चकमक उडाली नसल्याची माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या