ट्रम्प हरले तर ही अमेरिकेची शेवटची निवडणूक; रिपब्लिकन पक्षासाठी एलन मस्क मैदानात

टेस्लाचे सीईओ एलन मस्क अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. कमला हॅरिस यांचा विजय अमेरिकेच्या भविष्यासाठी चांगला नाही. डोनाल्ड ट्रम्प हरले, तर ही अमेरिकेसाठी शेवटची निवडणूक असेल. त्यामुळे ट्रम्प यांचे जिंकणे जरुरी आहे, असे वक्तव्य एलन मस्क यांनी केले. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले.

एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत एलन मस्क म्हणाले, “ट्रम्पचा पराभव हा माझ्यासाठी मोठा झटका असेल. तुम्हाला काय वाटतं, माझी तुरुंगातील शिक्षा केवढी मोठी असेल.” ते पुढे म्हणाले, लोकांना अवैध प्रवाशांना जाणूनबुजून काही राज्यांमध्ये आणले जात आहे. जेणेकरून त्यांना नागरिकत्व देऊन त्यांच्याकडून डेमोक्रेटिक पक्षासाठी मतदान करून घ्यायचे. हा एक मोठा खेळ आहे. कारण स्टेट मार्जिन कधी कधी 10-20 हजार मतांचे
असते.”

डेमोक्रेटिक पक्ष सत्तेत आला तर…
डेमोक्रेटिक पक्ष 4 वर्षे सत्तेत राहिला, तर देशात अनेक बेकायदेशीर गोष्टी कायदेशीर करतील. निवडणुकीत कुणी स्विंग स्टेट नसेल, एकपक्षीय देश बनेल. म्हणूनच कमला हॅरिस यांचा पराभव होऊन ट्रम्प जिंकावे.