`इफ्फी’ सोहळा पुढे ढकलला

कोरोनाचे संकट बघता देशातील प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) पुढे ढकलण्यात आला आहे. नियोजित वेळेपत्रकानुसार इफ्फी महोत्सव गोवा येथे 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान रंगणार होता. मात्र आता 16 ते 24 जानेवारी 2021 दरम्यान महोत्सव पार पडेल.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज इफ्फी सोहळा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती दिली. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतल्याचे जावडेकर यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची मार्गदर्शक तत्वे आणि शिष्टाचारानुसार पुढील वर्षी इफ्फी फेस्टिवल आयोजित करण्यात येत आहे. व्हच्र्युअल आणि फिजीकल अशा मिश्र पद्धतीने महोत्सव आयोजित केला जाईल. कोविड 19 संदर्भातील सर्व सूचनांचे आणि नियमावलींचे पालन करून महोत्सव होईल, असे जावडेकर यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या