‘इफ्फी’च्या इंडियन पॅनोरमासाठी, पाच मराठी चित्रपटांची निवड

510

50 व्या ‘इफ्फी’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सुरुवात 20 नोव्हेंबरपासून होणार आहे. यासाठी ‘इंडियन पॅनोरमा फीचर फिल्म’ विभागात निवड झालेल्या चित्रपटांची यादी जाहीर झाली असून यंदा या यादीमध्ये पाच मराठी चित्रपटांची निवड झाली आहे. यामध्ये सुजय डहाके दिग्दर्शित ‘तुझ्या आयला ‘, समीर विद्वांस दिग्दर्शित ‘आनंदी गोपाळ ‘, शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित ‘भोंगा’, अनंत महादेवन दिग्दर्शित ‘माईघाट ः क्राईम नंबर 1032005’ , आदित्य राही आणि गायश्री पाटील दिग्दर्शित ‘फोटोप्रेम ’ या मराठी चित्रपटांचा समावेश आहे. गणेश शेलार दिग्दर्शित ‘गढूळ’ हा मराठी चित्रपट ‘नॉन फिचर’ श्रेणीमध्ये प्रदर्शित होणार आहे.

इंडियन पॅनोरमात 26 फिचर आणि 15 नॉन फिचर असे एकूण 41 प्रादेशिक भाषांतील चित्रपट प्रदर्शित होतील. या पॅनोरमा विभागात बंगाली आणि मल्याळम भाषेतील प्रत्येकी तीन चित्रपट आहेत.

महोत्सवात 76 देशांचे 200 चित्रपट
पॅनोरमा विभागात गेल्या वर्षी फक्त दोन मराठी चित्रपट होते. या महोत्सवाच्या विविध विभागांत 76 देशांतील वेगवेगळ्या भाषांमधील 200चित्रपटांचा समावेश आहे. पणजी येथे 20 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत ‘इफ्फी’ चित्रपट महोत्सव पार पडणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या