एलईडी दिवे लावून बेकायदेशीरपणे मासेमारी करणाऱ्या चार नौका “जाळ्यात”

15
 सामना  प्रतिनिधी, रत्नागिरी
राजापूर तालुक्यातील साखरीनाटे समुद्रकिनारी नौकांवर अवैधरित्या जनित्राद्वारे एलईडी दिवे लावून मासेमारी करणाऱ्या चार नौकांवर जिल्हाधिकारी कार्यालय,जिल्हा पोलीस अधिक्षक आणि सहाय्यक आयुक्त  मत्स्य व्यवसाय कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज गुरूवारी कारवाई करण्यात आली.
कारवाई करण्यात आलेल्या नौकांमध्ये मालवण येथील गीता बापर्डेकर यांची  साईप्रसाद, साखरीनाटे येथील नियाज मस्तान यांची मुसाफिर,यासीन सोलकर यांची अलअजीज,गावडेआंबेरे येथील नरहरी मळेकर यांची हेमावती या नौकांचा समावेश आहे. मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त आनंद पालव,पोलीस उपनिरीक्षक मनोजकुमार सिंह यांच्यासह १६ जणांच्या पथकाने हि कारवाई केली.कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात एलईडी दिवे लावून बेकायदेशीर मासेमारी केली जाते त्याविरोधात सातत्याने कारवाई करा अशी मागणी प्रामाणिक मच्छिमारांकडून होत आहे.
आपली प्रतिक्रिया द्या