जालन्यात कैकाडी मोहल्ल्यातील दारुच्या अड्ड्यावर छापे; माल जप्त करून आरोपींना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना शहरातील कैकाडी मोहल्ल्यातील गावठी हातभट्टी दारुच्या अड्ड्यावर पोलीसांनी पहाटे कारवाई करत गावठी दारु व सडवा रसायन नष्ट करुन तब्बल 10 ट्राली माल जप्त केल्या तसेच आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन जारी असून मद्यविक्रीला मनाई असूनही दारुविक्री सुरू आहे. त्यामुळे पोलिसांनी जुना जालना भागातील कैकाडी मोहल्ला येथे गावठी हातभट्टी दारुच्या अड्ड्यांवर गुरुवारी सकाळी 6 ते 11 वाजेदरम्यान अचानक छापे मारले. या परिसरातील गावठी हातभट्टीची दारु व साडवा रसायन नष्ट करण्यात आले. तसेच हातभट्टीसाठी लागणारे साहित्य कोळसा, प्लॅस्टीक व लोखंडी ड्रम, लाकडे, टोपले, गुळ असे एकूण 10 ट्रॉली माल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, अपर पोलीस अधिक्षक समाधान पवार, उपविभागीय अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महाजन, सहायक पोलीस निरीक्षक सोनवळे, बनसोड, पोहेकॉ खरात, जावळे, हिवाळे, राठोड, खार्डे, लहामगे, जोनवाल, काकडे, सैय्यद तसेच पोलीस मुख्यालयाचे आरसीपी पथकाच कर्मचारी, नगर परिषदेचे अधिकारी व 30 कर्मचाऱ्यांनी केली.