अवैधरित्या गौण खनिज उत्खनन व साठा प्रकरण, 21 जणांची जमीन शासन जमा होणार

प्रातिनिधिक फोटो

अवैधरित्या गौण खनिज उत्खनन व साठा केल्याप्रकरणी कराड तालुक्यातील 85 प्रकरणातून महसूल विभागाला 4 कोटी 55 लाख 7 हजार 360 रुपये येणे बाकी असल्याने संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. दरम्यान 21 मिळकतधारकांच्या जमिनी सरकार जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. तर 14 मिळकतधारकांच्या जमिनीवर असणारी सरकारी नोंद केली होती. संबंधितांनी पैसे सरकारी तिजोरीत जमा केल्याने नोंद कमी केली आहे. 50 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या असून दंडात्मक रक्कम न भरल्यास त्यांच्या जमिनीवर सरकारची नोंद होणार असल्याची माहिती तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी दिली.

कराड तालुक्यातील गौण खनिज वाळू, मुरूम, माती अवैधरित्या उत्खनन केल्याप्रकरणी 85 जणांना यापूर्वीच नोटिसा दिल्या आहेत. वाळू उत्खनन व वाळू साठा अवैधरित्या अनेकांनी केला असल्यामुळे सदरची कारवाई 1997 पासून करण्यात आलेली प्रकरणे प्रलंबित आहेत. या अनुषंगाने महसूल विभागाने दंडात्मक कारवाईची रक्कम वसूल करण्याच्या अनुषंगाने नोटिसा बजावूनही प्रतिसाद न मिळाल्याने प्रशासकीय पातळीवरील कार्यवाहीस प्रारंभ केला आहे. ज्या व्यक्तींवर सदरचे कारवाई करण्यात आली आहे अशा संबंधितांच्या जमिनीवर सरकार अशी नोंद करण्यात येणार असल्याची कार्यवाही करण्यास महसूल विभागाने पाऊल उचलले आहे.

21 व्यक्तींच्या जमिनीवर “सरकार” असे नाव लावण्यात येणार आहे. अशा व्यक्तींची नाव, गाव व रक्कम अशी. किरण बाबासो पाटील (येरवळे), 8 लाख 49 हजार. विक्रम महादेव शिंदे (ओंड), 21 लाख 78 हजार 450. अधिक आनंदा सावंत (ओंडोशी) 31 लाख 33 हजार 97. शंकरराव रामचंद्र थोरात (कार्वे) 3 लाख 12 हजार 812. संदीप ज्योतीराम बोराटे,(विलवडे), 2 लाख 20 हजार 875. दत्तात्रय किसन माने (मालखेड) 2 लाख 61 हजार 562. संग्राम महेश थोरात (शिरवडे) 2 लाख 61 हजार 562. निवास बाबासो थोरात (शिरवडे) 86 हजार 687. निलेश बाबुराव जगदाळे शिरोडे 15 हजार. विठ्ठल पांडुरंग जगदाळे (मयत) वारस सुनील विठ्ठल जगदाळे (शिरवाडे), 15 हजार. दादासो जगन्नाथ डुबल (शिरवडे) 48 हजार 437. आनंदा हरी थोरात,आण्‍णासो आनंदा थोरात (शिरवडे) 15 हजार. प्रमोदसिंह हिंदुराव जगदाळे, हिंदुराव अंतु जगदाळे (शिरवडे), 1 लाख 43 हजार 375. हणमंत गणपती जगदाळे (शिरवडे), 6 लाख 23 हजार 837. प्रवीण भाऊसाहेब पिसाळ (नडशी), 5 लाख 8 हजार 5. रामचंद्र उर्फ चंद्रकांत दादा थोरात (नडशी). 2 लाख 78 हजार 875. रवींद्र सुभाष थोरात (नडशी), 56 हजार 250. संजय बाळकृष्ण थोरवडे (वारुंजी), 17 लाख 62 हजार 500. रामचंद्र पंढरीनाथ खालकर (मयत) वारस सुवर्णा रामचंद्र खालकर (खालकरवाडी) 26 लाख 67 हजार. विनायक बाळाराम पवार (बामणवाडी) 33 हजार 591. उत्तम हिंदुराव देसाई (बामणवाडी) 1 लाख 78 हजार 43.

या 21 जणांकडून 1 कोटी 46 लाख 66 हजार 275 रुपये दंडात्मक येणे बाकी आहे. आत्तापर्यंत महसूल विभागाने दोन नोटिसा पाठवूनही प्रतिसाद न दिल्यामुळे सदर व्यक्तींच्या जमिनीवर “सरकार” अशी नोंद करण्याची कार्यवाही महसूल विभागाने हाती घेतले आहे. संबंधित व्यक्तीनी वाळू, माती, मुरुम अवैधरीत्या उत्खनन केले व साठा केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करून नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.

दरम्यान कराड तालुक्यातील 14 जणांच्यावर शासकीय आदेशाने जमिनीवर बोजा नोंद केला होता. दंडात्मक रक्कम संबंधित व्यक्तीनी भरल्यामुळे त्यांच्या जमिनीवरील सरकार नोंद कमी करण्यात आली आहे.

दंडात्मक रक्कम भरलेली व्यक्ती,गाव, रक्कम पुढीलप्रमाणे. लालासो उर्फ विनायक शंकर यादव (पोतले) 75 हजार. सुनील गोविंद यादव (कोर्टी) 17 हजार 500. बाळासो पोपट जाधव (तासवडे) 96 हजार 100. युवराज भार्गव जाधव (तासवड) 79 हजार 200. संदीप जालिंदर पाटील (बेलवडे हवेली), 54 हजार 150. सुरेश उर्फ सुभाष बाबुराव पाटील (वाठार), 50 हजार. राहुल प्रताप्राव मोहिते (रेठरे बुद्रुक), 49 हजार 100. संजय आनंदराव जाधव (तासवडे) 39 हजार 600. लक्ष्मण रामचंद्र पवार (शहापूर), 35 हजार 650. प्रमोद वसंतराव मोहिते (रेठरे बुद्रुक), 23हजार 900. दादा विष्णू जगदाळे, गणेश दादा जगदाळे (तासवडे) 19 हजार 800. राजू आकाराम मोरे (कोडोली) 11 हजार 840. संभाजी शंकर जगताप (कोडोली) 9 हजार 444. अधिकराव श्रीरंग पाटील (कोडोली) 4 हजार 752.

या 14 व्यक्तीनी 7 लाख 23 हजार 536 रुपये महसूल विभागाने दंडात्मक आकारलेली रक्कम शासनाच्या खजिन्यात भरल्यामुळे त्यांच्या जमिनीवर नोंद असलेला बोजा कमी करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या