
रॅपर बादशहा हा कायम चर्चेत असतो. त्याची गाणी ही तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. सध्याच्या घडीला तो एका रिअॅलिटी शोसाठी परीक्षक म्हणून काम करत आहे. नुकताच बादशहाने एक सेल्फी शेअर केल्यावर त्याच्यावर ट्रोलर्स अक्षरशः तुटून पडले. या फोटोमध्ये बादशहाचे डोळे हे लालबुंद दिसत होते. त्यामुळे ट्रोलर्सनी त्याच्यावर अक्षरशः कमेंटसचा मारा केला. यावर बादशहाने एक व्हिडीओ शेअर करत डोळे लालबुंद असण्यामागील कारण सांगितले आहे.
बादशहाने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात तो म्हणतो, “कसे आहात मित्रांनो? काल, मी माझ्या मागील स्टोरीमध्ये एक फोटो पोस्ट केला होता ज्यामध्ये माझे डोळे लाल होते आणि तो फोटो थोडा अस्पष्ट होता. फोटो पोस्ट करण्यापूर्वी मी ४८ तास झोपलो नव्हतो. मी नुकताच एका रिअॅलिटी शोच्या शूटिंगवरून परत आलो आहे.”
बादशहा पुढे म्हणाला, ” मी हे सांगायला विसरलो की मी खूप थकलो होतो.” तो फोटो पोस्ट केल्यानंतर मला झोप लागली.” जेव्हा मी सकाळी उठलो, तेव्हा खूप प्रेमळ लोकांनी मला मेसेज केले, “भाऊ, तू ठीक आहेस ना?” तुम्ही रात्री दोन वाजता झोपल्यानंतर तुमची अवस्था काय असणार आहे. रात्री उशीरा झोपल्यानंतर तुमची प्रतिकारशक्ती कमी होते. काहीजण तर मला विचारत होते, “मी कोणत्या प्रकारचे औषध घेत आहे?” “भाऊ, जे मला ओळखतात त्यांना माहित आहे की मी कोणतेही औषध घेत नाही. मला फक्त कामाचे व्यसन आहे. म्हणून, तुमच्या काळजीबद्दल धन्यवाद. पण इंटरनेट हे एक अद्भुत ठिकाण आहे.”
बादशाहचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल होत आहे. त्याने त्याच्या शैलीत उत्तर दिल्याने ट्रोलर्स आता थंडावले आहेत.




























































