अंत्ययात्रेमध्ये नमाज पढण्यासाठी गेला, मृताला जिवंत पाहून मौलवी गचकला

21039

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सौदी अरेबियामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माराकोच येथे एक मौलवी अंत्ययात्रेमध्ये नमाज पढण्यासाठी गेला होता. परंतु मृताला जिवंत पाहून धक्का बसलेला मौलवी हार्ट अटॅकने गेला. स्थानिक प्रसारमाध्यमांनी याबाबत वृत्त दिले आहे.

‘लाईफ इन सौदी अरेबिया न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, माराकेच शहरातील रुग्णालयात एका व्यक्तीला उपचारादरम्यान डॉक्टरांनी मृत घोषित केले. परंतु त्यावेळी त्याचा श्वास धिम्या गतीने सुरू होता. डॉक्टर एवढ्यावरच थांबले नाही तर त्या व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र देखील तयार केले. डॉक्टरांनी याची माहिती मृताच्या कुटुंबीयांना दिली.

डॉक्टरांच्या माहितीवर विश्वास ठेऊन मृताच्या कुटुंबीयांनी त्याच्या अंत्ययात्रेची तयारी सुरू केली. अंत्ययात्रेमध्ये नमाज पढण्यासाठी जवळच्या मशिदीतून मौलवीला बोलावण्यात आले. मौलवी नमाज पढण्यासाठी पोहोचला तेव्हा मृत व्यक्ती झोपलेला होता. परंतु मौलवीने नमाज पढण्यास सुरुवात केली आणि अंत्ययात्रेवरील व्यक्ती जागा झाला. हे पाहून मौलवी एवढा घाबरला की त्याला हार्ट अटॅक आला आणि तो जाग्यावर कोसळला. लोकांनी मौलवीला रुग्णालयात दाखल केले, परंतु तोपर्यंत उशिर झाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या