
आंतरराष्ट्रीय नाणे निधीने पाकिस्तानला एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी (ईएफएफ) कर्जाचा हप्ता म्हणून 1 अब्ज डॉलर्स व रेझिलियन्स अॅण्ड सस्टेनेबिलिटी फॅसिलिटी (आरएसएफ) अंतर्गत 1.3 अब्ज डॉलर्सचा हप्ता शुक्रवारी मंजूर केला. याला तीव्र विरोध करत हिंदुस्थान याच्या मतदानापासून दूर राहिला व मतभिन्नता नोंदवली.
या पैशांचा वापर पाकिस्तान दहशतवादी कारवायांसाठी करू शकतो. पाकचा ट्रक रेकॉर्डही खराब आहे, असा दावा करणारे प्रसिद्धिपत्रक हिंदुस्थानने जारी केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तान आयएमएफकडून कर्ज घेत आहे. कर्ज देताना लादलेल्या अटींचे पाकने वारंवार उल्लंघन केले आहे. पाकिस्तान लष्करी कारवायांमध्ये गुंतलेला आहे. लष्कराचा पाकमधील आर्थिक धोरणातही हस्तक्षेप असतो. त्यामुळेच पाकची आर्थिक प्रगती होत नाही, असेही हिंदुस्थानने प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
कर्जाचा डोंगर
– वारंवार बेलआऊटमुळे पाकवर कर्जाचा डोंगर आहे. बेलआऊटची संधी देण्यापूर्वी नाणे निधीने त्या देशाची तथ्ये विचारात घेतली पाहिजे, असे आवाहनही हिंदुस्थानने केले आहे.