मुंबई हे बॉलिवूडचे हृदय, कुणी कुठेही घेऊन जाऊ शकत नाही -इम्पा

बॉलीवूडला खऱया अर्थाने वाढवण्याचेआणि जगभरात पोहोचवण्याचे काम मुंबईने केले आहे.हे शहर अत्यंत उत्साही असून इतर शहरांच्या तुलनेत येथे शूटिंगसाठी वर्षभर उत्तम वातावरण असते. या इंडस्ट्रीचा भक्कम पाया असलेले निर्माते, दिग्दर्शकांपासून ते तंत्रज्ञांपर्यंत सगळे इथलेचआहेत.

मुंबई हे बॉलीवूडचे हृदय असूनकोणीही ते पुठेही घेऊ जाऊ शकत नाही,असे ठाम मत इंडियन मोशन पिक्चर्स प्रोडयुसर्स असोशिएशनने (इम्पा) मांडले आहे. इम्पा ही हिंदी चित्रपटसृष्टीसाठी काम करणारी अत्यंत जूनी संघटना असून 1937 पासून कार्यरत आहे. या संघटनेचे अध्यक्ष टी.पी. अगरवाल यांनीनुकतेच निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. लॉकडाऊनमुळे हिंदी चित्रपटसृष्टीलामोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर मराठी चित्रपटांप्रमाणे हिंदी चित्रपटांना सबसिडी आणि करमणूक कर सवलत मिळावी, फिल्मसिटीत शूटिंगसाठी 25 टक्के सवलत मिळावी तसेच शूटींगसाठी लागणा-या विविध परवानग्या एकाच खिडकीवर मिळाव्यात अशा अपेक्षा संघटनेच्यावतीने व्यक्त करण्यात आल्या आहे.

आपली प्रतिक्रिया द्या