देशभरातील महत्वाच्या घडामोडी

केदारनाथ मंदिरात भक्तीचा महापूर

उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग येथील केदारनाथ मंदिरात भक्तीचा ओघ सुरूच आहे. मुसळधार पावसातही मोङ्गय़ा संख्येने भाविक केदारनाथ मंदिरात दर्शनासाङ्गी येत असल्याचे वृत्त आहे. 10 मेपासून आतापर्यंत तब्बल 7 लाखांहून अधिक भाविकांनी केदारनाथाचे दर्शन घेतले.

200 दहशतवादी मणिपूरमध्ये?

दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचे निर्देश बांगलादेश सरकारने दिल्यानंतर तब्बल 200हून अधिक दहशतवादी बांगलादेश आणि हिंदुस्थानच्या सीमेवर पळाले आहेत. हे दहशतवादी मिझोराममार्गे मणिपूरमध्ये प्रवेश करू शकतात. दरम्यान, जिरीबाममध्ये दहशतवाद्यांनी दोन चौक्या आणि 70 घरे पेटवून दिल्याची माहिती समोर आली आहे.

चार दिवस उष्णतेची लाट

पुढील चार दिवस उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि ओदिशात काही ङ्गिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. तापमानात 3 ते 5 अंशांनी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

रामोजी राव अनंतात विलीन

वृत्त आणि मनोरंजन क्षेत्रात क्रांती घडवणारे रामोजी समूहाचे अध्य रामोजी राव (88) यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. रामोजी राव यांच्यावर आज रामोजी फिल्म सिटी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.