जगभरातील महत्वाच्या घडामोडी

हिंदुस्थान आणि चीनच्या युद्धनौका कोलंबोत दाखल

हिंदुस्थान आणि चीनच्या चार युद्धनौका एकाच दिवशी श्रीलंकेची राजधानी कोलंबोत दाखल झाल्या आहेत. यामध्ये हिंदुस्थानची युद्धनौका आयएनएस मुंबई तर चीनच्या तीन युद्धनौकांचा समावेश आहे. या युद्धनौकेचे श्रीलंकेच्या नौदलाने स्वागत केले. आयएनएस मुंबई ही 163 मीटर लांबीची युद्धनौका असून या युद्धनौकेवर 410 क्रू मेंबर्स आहेत.

गॅस गळतीमुळे ‘स्पेसवॉक’ मिशन रद्द

एलन मस्क यांच्या कंपनीचे डॉन मिशन अखेरच्या क्षणी रद्द करण्यात आले. हे मिशन आज 4 वाजून 8 मिनिटाला उड्डाण करणार होते. परंतु, गॅस गळती झाल्यामुळे हे मिशन एक दिवस पुढे ढकलण्यात आले आहे. हे मिशन आता उद्या, बुधवारी दुपारी 1 वाजून 8 मिनिटांनी लाँच केले जाणार आहे. स्पेसएक्सच्या स्पेसक्राफ्टने 4 अंतराळवीर पृथ्वीपासून जवळपास 700 किलोमीटर उंचीवर अंतराळामध्ये जाणार आहेत.

एचयूएलला 962 कोटींची नोटीस

हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडला (एचयूएल) आयकर विभागाने 962.75 कोटी रुपयांची नोटीस बजावली आहे. ज्यात 329.3 कोटी रुपयांच्या व्याजाचा समावेश आहे. ही नोटीस टीडीएसच्या गैरकारभारामुळे बजावण्यात आली आहे. या नोटिसीविरोधात कंपनी अपील करणार आहे. कंपनीला नोटीस मिळाल्यानंतर हिंदुस्थान युनिलिव्हरच्या शेअर्समध्ये आज घसरण पाहायला मिळाली.

दोन मर्सिडीजची जोरदार धडक

आलिशान मर्सिडीज-बेंझ एएमजी जीटी 63 एसई परफॉर्मन्स आणि मर्सिडीज-बेंझ एएमजी एसएल 55 रोडस्टर या दोन मर्सिडीज कारचा समोरासमोर बसलेल्या जोरदार धडकेत चक्काचूर झाला. ही घटना केरळच्या कोच्ची येथे घडली. एका कारची किंमत 2.44 कोटी तर दुसऱ्या कारची किंमत 3.30 कोटी रुपये आहे. कारचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.