
पोलीस असल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्या तिघांना दिंडोशी पोलिसांनी अटक केली. अमित पुमी, सुधीर पुजारी आणि विनोद सदर अशी त्या तिघांची नावे आहेत. तक्रारदार हे जून महिन्यात कामानिमित्त बोरिवली येथे आले होते. ते गोरेगावच्या दिंडोशी येथे काम आटपून घरी जात असताना मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी पोलीस असल्याचे भासवत त्याची रिक्षा अडवली. ड्रगची तस्करी करत असल्याचा आरोप करून कागदपत्रांची मागणी करत पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले. या प्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद करत सीसीटीव्हीच्या आधारे माहिती गोळा करून आरोपीला अटक केली.



























































