इम्रान खान यांना हिंदुस्थानी हवाई हद्दीतून उड्डाणाला परवानगी

हिंदुस्थानने मनाचा मोठेपणा दाखवत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या विमानाला आपल्या हवाई हद्दीतून उड्डाण करण्यासाठी परवानगी दिली आहे. इम्रान खान पहिल्यांदाच श्रीलंका दौऱयावर जाणार असून या वेळी त्यांचे विमान हिंदुस्थानी हवाई क्षेत्रातून उड्डाण करणार आहे.

23 फेब्रुवारी रोजी इम्रान खान यांचा श्रीलंका दौरा नियोजित आहे. विशेष म्हणजे 2019 मध्ये पाकिस्तानने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपले हवाई क्षेत्र वापरण्याची परवानगी नाकारली होती. नरेंद्र मोदी अमेरिका आणि सौदी अरेबिया दौऱयावर असताना ही परवानगी नाकारण्यात आली होती. कश्मीरमध्ये मानवाधिकार हक्कांचे उल्लंघन होत असल्याचे सांगत पाकिस्तानने हिंदुस्थानला स्पष्ट नकार दिला होता, पण हे सारे विसरून हिंदुस्थानने मात्र पंतप्रधान इम्रान खान यांच्या पहिल्या श्रीलंका दौऱयासाठी प्रवासाला आपले हवाई क्षेत्र वापरण्याची परवानगी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या