कमलनाथ लुच्छे, लफंगे; इमरती देवींचा पलटवार

काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि मध्ये प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भाजपच्या महिला उमेदवार इमरती देवी यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह्य टीका करत त्यांना ‘आयटम’ म्हणाले होते. त्या विधानावरून गदारोळ झाल्यानंतरही कमलनाथ यांनी माफी मागण्यास नकार दिला होता. त्यानंतर आता इमरती देवी यांनी कमलनाथ यांच्यावर पलटवार केला आहे.

इमरती देवींचा पलटवार

‘माजी मुख्यमंत्री जर अशी भाषा वापरत असतील तर मी देखील असे बोलू शकते. अशी भाषा वापरू शकते. कमलनाथ हे लुच्छे, लफंगे आहेत. ते बेवड्यासारखे वागतात’, असा पलटवार इमरती देवी यांनी केला आहे. भाजपच्या उमेदवार इमरती देवी या डबरा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे उमेदवार असलेले सुरेंद्र राजेश निवडणूक लढवत आहेत.

काय म्हणाले होते कमलनाथ

मध्य प्रदेशमध्ये होत असलेल्या पोटनिवडणुकीचा प्रचार सुरू आहे. डबरा येथून काँग्रेसचे उमेदवार असलेले सुरेंद्र राजेश यांच्या प्रचारादरम्यान कमलनाथ म्हणाले की, ‘सुरेंद्र राजेश आमचे उमेदवार असून ते साध्या सरळ स्वभावाचे आहेत. ती यांच्या सारखी नाही, काय नाव आहे तीच? मी काय तीच नाव घेऊ, तुम्ही तर माझ्यापेक्षाही तिला चांगल्याप्रकारे ओळखता. तुम्ही तर मला आधीच सावध करायला हवं होतं की, ही काय आयटम आहे.’, असं ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानाविरोधात भाजपने निवडणूक आयोगात तक्रार देखील दाखल केली आहे.

राहुल गांधींनी व्यक्त केलेली नाराजी

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना याप्रश्नी मौन सोडत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. राहुल गांधी म्हणाले की, कमलनाथ हे काँग्रेस पक्षाचे आहेत, मात्र अशा प्रकारची भाषा योग्य नाही. पुठल्याही नेत्याला अशी भाषा वापरणं हे चांगले नाही. मला अशी भाषा वापरणे हे मुळीच आवडलेलं नाही. मग तो कोणीही असो, असे वक्तव्य करणे, हे दुर्दैवी असल्याचे राहुल गांधी म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या