गोरेगावच्या पांडुरंगवाडीतील कृत्रिम विसर्जन तलावाचे लोकार्पण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेच्या माध्यमातून गोरेगाव पूर्व, पांडुरंगवाडी येथील नूतनीकरण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावाचे लोकार्पण आज शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या तलावामुळे पांडुरंगवाडी आणि परिसरातील गणेशभक्तांसाठी मोठी सुविधा निर्माण झाली आहे.

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या खासदार निधीतून आणि स्थानिक नगरसेवक अंकित प्रभू यांच्या पाठपुराव्यातून हा विसर्जन तलाव व परिसराचा कायापालट करण्यात आला आहे. त्यामुळे पु. ल. देशपांडे उद्यान, पांडुरंगवाडी येथील या परिसराला आता अत्यंत विहंगम व सुसज्ज स्वरूप प्राप्त झाले आहे. या तलावाच्या सुशोभीकरणाचे आणि दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. तलावाच्या लोकार्पण सोहळ्याला शिवसेना नेते, विभागप्रमुख, आमदार सुनील प्रभू, आमदार बाळा नर यांच्यासह शिवसैनिक आणि पांडुरंगवाडीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.