#INDvWI गावस्करांचा ‘तो’ विक्रम सचिन तेंडुलकरही मोडू शकला नाही

1257

गुरुवारपासून (22 ऑगस्ट) टीम इंडिया आणि वेस्ट इंडीज संघात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होईल. या निमित्ताने टीम इंडियाचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांची सर्वांना आठवण होत आहे. गावस्कर यांचा एक असा पराक्रम आहे तो खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, ब्रायन लारालाही मोडता आलेला नाही.

दोन्ही देशात आतापर्यंत अनेक कसोटी क्रिकेट सामने खेळले गेले आहेत. यात गावस्कर यांच्या नावावर वेस्ट इंडीजविरोधात कसोटीमध्ये एकूण 13 शतकांची नोंद आहे. विशेष म्हणजे वेस्ट इंडीजच्या वेगवान माऱ्यासमोर खेळताना गावस्कर यांनी हा विक्रम केला आहे. दोन दशकांपासून त्यांचा हा विक्रम अबाधित आहे.

गावस्कर यांच्यानंतर वेस्ट इंडीजचे क्लाईव्ह लॉयड यांनी हिंदुस्थानविरुद्ध 7 शतकं ठोकण्याची किमया केली आहे. यानंतर द्रविड 5 शतकं आणि लक्ष्मण 4 शतकांसह अनुक्रमे तीसऱ्या आणि चौथ्या स्थानी आहेत. तर सचिन तेंडुलकर तीन शतकांसह पाचव्या स्थानी आहे.

सर्वाधिक सरासरी
गावस्कर यांनी वेस्ट इंडीजविरुद्ध 27 कसोटी सामन्यात 13 शतकं ठोकली आहेत. 65.45 च्या सरीसरीने त्यांनी या धावा ठोकल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या