
सामना ऑनलाईन, मुंबई
हिंदुस्थानी संघाने दुसऱ्या डावात आघाडी आणखी बळकट करण्यासाठी कसोशीने प्रत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नान संघाने आत्तापर्यंत 3 विकेट गमावल्या आहेत. दिवसाचा खेळ संपला तेव्हा हिंदुस्थानी संघाकडे 166 धावांची आघाडी होती. लोकेश राहुल अर्धशतकाला 6 धावा कमी असताना बाद झाला. मुरली विजयलाही फारशी चांगली कामगिरी करता आली नाही आणि तो 18 धावांवर बाद झाला. पहिल्या डावात झुंजार शतकी खेळी साकारणारा चेतेश्वर पुजारा जबरदस्त फॉर्मात दिसत असून त्याची अर्धशतकाकडे वाटचाल सुरू आहे. विराट कोहलीच्या साथीने त्याने आघाडी बळकट करण्याचा प्रयत्न केला मात्र विराट कोहली 34 धावांवर बाद झाल्याने ही भागीदारी संपुष्टात आली आहे.
57.1: WICKET! V Kohli (34) is out, c Aaron Finch b Nathan Lyon, 147/3 https://t.co/bkvbHd9pQy #AusvInd
— BCCI (@BCCI) December 8, 2018





























































