हिंदुस्थानचा स्टार फलंदाज आणि कर्णधार रोहित शर्मा आगामी बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. 43 दिवसांच्या विश्रांतीनंतर टीम इंडिया बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी आणि तीन टी20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. विशेष म्हणजे कसोटी मालिकेत हिटमॅन रोहित शर्माला विरेंद्र सेहवागचा विक्रम मोडण्याची संधी आहे.
बांगलादेश आणि टीम इंडिया यांच्यामध्ये 19 सप्टेंबर पासून दोन कसोटी आणि तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाकडून सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम विरेंद्र सेहवागचा च्या नावावार आहे. विरेंद्र सेहवागने 103 कसोटी सामन्यांमध्ये एकून 90 षटकार ठोकले आहेत. तर रोहित शर्माने 59 कसोटी सामन्यांमध्ये 84 षटकार ठोकले आहेत. तसेत या क्रमवारीत महेंद्र सिंग धोनी 78 षटकार खेचत तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. चौथ्या क्रमांकावर सचिन तेंडूलकर (69 षटकार) आणि पाचव्या क्रमांकावर रविंद्र जडेजा (64 षटकार) यांचा समावेश आहे. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम इंग्लंडच्या बेन स्टोक्सच्या नावावार आहे. त्याने 190 कसोटी सामन्यांमध्ये 131 षटकार ठोकले आहेत.
विरेंद्र सेहवागचा विक्रम मोडण्यासाठी रोहित शर्माला फक्त 7 षटकारांची आवश्यकता आहे. त्यामुळे या कसोटी मालिकेत चाहत्यांच्या नजरा रोहित शर्मावर असणार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. रोहितने वनडे, कसोटी आणि टी20 या तीन्ही फॉरमॅटमध्ये एकून 483 सामने खेळले असून 620 षटकारांची आतषबाजी केली आहे. आगामी बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी पुढील काही दिवसांमध्ये हिंदुस्थानच्या संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे.