Photo – ओव्हलमध्ये विजयाची टीम इंडियाला 50 वर्षांपासून प्रतिक्षा, जाणून घ्या रेकॉर्ड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लीड्समधील हेडिंग्ले मैदानावर डावाने दारुण पराभव झाल्यानंतर हिंदुस्थानचा संघ लंडनच्या ओव्हल मैदानावर उतरणार आहे. 2 सप्टेंबरपासून येथे चौथ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. मात्र या मैदानावरील हिंदुस्थानची कामगिरी खराब असून यामुळे विराटसेनेपुढील आव्हान वाढले आहे. (सर्व फोटो बीसीसीआय/आयसीसी)

ind-v-eng

ओव्हलच्या मैदानावर हिंदुस्थानी संघाने आतापर्यंत 13 सामने खेळला आहे. यात हिंदुस्थानच्या संघाला पाच पराभव सहन करावे लागले, तर एक सामना जिंकण्यात यश मिळाले. तसेच दोन्ही संघात खेळले गेलेले 7 सामने येथे अनिर्णित राहिले आहेत.

ind-v-eng-7

हिंदुस्थानच्या संघाला 1936, 1959, 2011, 2014 आणि 2018 मध्ये येथे पराभव सहन करावा लागला. तर 1946, 1952, 1979, 1982, 1990, 2002 आणि 2007 मध्ये खेळले गेलेले सामने अनिर्णित राहिले.

ind-v-eng-5

ओव्हलच्या मैदानावरील एकमेव विजय हिंदुस्थानला 1971 मध्ये मिळाला. गेल्या 50 वर्षात हिंदुस्थानचा संघ येथे विजय मिळवू शकलेला नाही. तसेच गेल्या तीन दौऱ्यात हिंदुस्थानचा येथे दारुण पराभव झालेला आहे.

ind-v-eng-8

2011 मध्ये हिंदुस्थानला एक डाव आणि 8 धावांनी, तर 2014 मध्ये एक डाव आणि 244 धावांनी पराभव सहन करावा लागला. या दोन्ही लढतीत महेंद्रसिंह धोनी हिंदुस्थानचा कर्णधार होता. 2018 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाला देखील या मैदानावर 118 धावांनी पराभूत व्हावे लागले होते.

ind-v-eng-3

खराब फॉर्मात असणारा कर्णधार विराट कोहली याने ओव्हलच्या मैदानावर चार डावांमध्ये फलंदाजी केली असून त्याला एकदाही येथे 50 धावांचा आकडा पार करता आलेला नाही. तर दुसरीकडे इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुट याने येथे हिंदुस्थानविरुद्ध खेळलेल्या दोन्ही कसोटीत शतक झळकावले होते.

ind-v-eng-2