अल्पवयीन मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन त्याच्या मित्रांनी अश्लील चाळे करण्यास प्रवृत्त केल्याची घटना वांद्रे परिसरात घडली. दोन अल्पवयीन मुलांची रवानगी बालगृहात केली. पीडित मुलगा हा वांद्रे परिसरात राहतो. त्याच परिसरात त्याचे दोन मित्र राहतात. गेल्या आठवडय़ात सायंकाळी दोन मुलांनी पीडित मुलाला एका नाल्याजवळ आणले. त्याला त्या दोघांनी धमकी दिली. त्यानंतर त्याच्यासोबत अश्लील चाळे करण्यास प्रवृत्त केले. मुलाला धमकी देत लैंगिक अत्याचार केला. मुलाच्या आईने तक्रार दाखल केल्यानंतर दोघा मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले.