हिंदुस्थान सर्वबाद २०९, द.आफ्रिकेला १४२ धावांची आघाडी

सामना ऑनलाईन । केपटाउन

हिंदुस्थान-दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत दुसऱ्या दिवसअखेर हिंदुस्थानचा डाव २०९ धावांवर आटोपला. नंतर पुन्हा फलंदाजीसाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने १५ षटकांत २ बळी गमावून ६५ धावा केल्या आणि हिंदुस्थानवर १४२ धावांची आघाडी घेतली आहे.

याआधी पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेने सर्वबाद २८६ धावा केल्या. हिंदुस्थानचे आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर हार्दिक पंड्याने ९३ धावांची झुंजार खेळी करुन सामन्यातले आव्हान कायम राखले. हिंदुस्थानचा डाव आटोपला त्यावेळी ७७ धावांची आघाडी घेऊन दक्षिण आफ्रिकेचा संघ पुन्हा फलंदाजीसाठी मैदानात आला. सलामीवीर मारक्रम (३४) आणि एल्गर (२५) धावा करुन बाद झाले. रबाडा आणि आमला मैदानावर आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या