‘शेजाऱ्यांमध्ये फूट पाडत आहे’, अमेरिकी परराष्ट्रमंत्रीच्या हिंदुस्थान दौरवर चीनने व्यक्त केला संताप

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांच्या हिंदुस्थान दौऱ्यावर चीनने मंगळवारी संताप व्यक्त केला आहे. अमेरिका शेजारच्या देशांमध्ये फूट पडायचे काम करत असल्याचा आरोप चीनने केला आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री नवी दिल्ली येथे झालेल्या द्विपक्षीय संरक्षण आणि दोन्ही देशांमध्ये संबंध अधिक दृढ व्हावे यासाठी आयोजित उच्चस्तरीय बैठकीत सामील झाले होते.

पोम्पिओ सोमवारी अमेरिकी संरक्षणमंत्री मार्क टी. एस्पर हे सोमवारी हिंदुस्थानी दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी सोमवारी 2 + 2 च्या तिसऱ्या फेरीच्या वार्तासाठी हिंदुस्थानचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. हिंदुस्थानच्या दौर्‍यानंतर पोम्पिओ श्रीलंका आणि मालदीवच्या दौऱ्यावरही जाणार आहेत.

हिंदुस्थानी दौऱ्यावर आलेल्या माइक पोम्पिओ यांनी हिंदुस्थान-चीन सीमावादावर आपलं मत व्यक्त करत हिंदुस्थनची बाजू घेतली आहे. ते म्हणाले की, ‘गलवान हिंसाचारात शहीद झालेल्या 20 सैनिकांसह जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या हिंदुस्थानी सैनिकांच्या सन्मानार्थ आम्ही राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट दिली.’

आपली प्रतिक्रिया द्या