हिंदुस्थान आणि इंग्लंड उपांत्य फेरीत पोहोचणार, ब्रायन लाराचा विश्वास

सामना प्रतिनिधी । मुंबई

इंग्लंडमध्ये 30 मेपासून सुरू होणार्‍या क्रिकेट वर्ल्ड कपचे पडघम वाजू लागले आहेत. बहुतांशी देशांनी प्रतिष्ठsच्या स्पर्धेसाठी आपल्या संभाव्य संघांची घोषणाही करून टाकलीय. याच पार्श्वभूमीवर वेस्ट इंडीजचा माजी महान फलंदाज ब्रायन लारा याने एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत विश्वास व्यक्त करताना म्हटले की, ‘वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत कोणते चार संघ येतील हे आताच सांगणे कठीण आहे. पण गेल्या काही महिन्यांतील कामगिरीवर नजर टाकता यजमान इंग्लंड व हिंदुस्थान यांचा सेमी फायनलमधील प्रवेश पक्का आहे असे त्याला वाटते.’  

…म्हणून अव्वल दर्जाचे वेगवान गोलंदाज तयार झालेत

आता जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा, उमेश यादव यांसारखे अव्वल वेगवान गोलंदाज टीम इंडियात आहेत. बीसीसीआयने वेगवान गोलंदाजांसाठी स्पेशल योजना आखली. ती अमलातही आणली. नव्या ‘सिस्टम’मुळे हिंदुस्थानला चांगल्या तोडीचे वेगवान गोलंदाज सापडलेत, असे ब्रायन लारा आवर्जून म्हणाला.

सध्या टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याची तुलना मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरशी केली जाते. यावर ब्रायन लारा म्हणाला,  सचिन तेंडुलकरने प्रदीर्घ काळ क्रिकेट खेळून जगभरात धावांचा पाऊस पाडलाय हे विसरता कामा नये. विराट कोहलीने त्याच्याकडून हे शिकायला हवे.

आपली प्रतिक्रिया द्या