फ्लॅग मिटींगसाठी गेलेल्या जवानांवर झाडल्या गोळ्या, एक शहीद

1694

हिंदुस्थान बांगलादेश सीमेवर फ्लॅग मिटिंगसाठी गेलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना बांगलादेश बॉर्डर गार्ड्सच्या जवानांनी घेराव घालत त्यांच्यावर गोळीबार केला आहे. या गोळीबारात एक जवान शहीद झाला आहे. विजय भान सिंग असे त्या जवानाचे नाव असून त्यांच्या डोक्यात गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. बांगलादेशच्या जवानांच्या या कारवाईचा हिंदुस्थानने निषेध केला आहे. तसेच बांगालदेशच्या या नापाक हरकतीनंतर संपूर्ण बांगलादेश सीमेवर सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

पश्चिम बंगालमधील पद्मा नदीत काही स्थानिक मच्छिमार मासेमारी करत असताना बांगलादेशच्या जवानांनी त्या मच्छिमारांना ताब्यात घेतले. त्या मच्छिमारांच्या सुटकेसाठी सीमेवर हिंदुस्थानच्या सीमा सुरक्षा दल (BSF) व बांगलादेशच्या बॉर्डर गार्ड्सच्या जवानांची फ्लॅग मिटिंग होणार होती. त्या बैठकीसाठी हिंदुस्थानकडून पाच जवान व एक कमांडर गेले होते. मात्र बांगलादेशकडून सुरूवातीपासूनच बैठकित आक्रमक पवित्रा घेतलेला होता. त्यामुळे हिंदुस्थानच्या जवानांनी बैठक थांबवत माघारी परतण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी बांगलादेशच्या सय्यद इफ्तार नावाच्या जवानाने हिंदुस्थानी जवानांवर गोळीबार केला. या गोळीबारात हेड कॉन्स्टेबल विजय भान सिंग हे शहीद झाले तर यादव नावाचे एक जवान जखमी झाले.

 

आपली प्रतिक्रिया द्या