लडाख सीमेवर चीनच्या तोफा धडाडल्या! युद्धाची तयारी सुरू आहे का?

1607

एकीकडे हिंदुस्थानबरोबर चर्चेचे नाटक आणि दुसरीकडे सीमेवर कुरापती सुरूच ठेवण्याचे चीनचे धोरण कायम आहे. चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीने लडाख सीमेजवळ अत्याधुनिक शस्त्रांसह युद्ध सराव सुरू ठेवला आहे. सीमेजवळ क्षेपणास्त्र आणि तोफा धडाडल्या आहेत. दरम्यान लालमाकडांकडून युद्धाची तयारी सुरू आहे का? असा प्रश्न उपस्थितीत होत आहे.

गेल्या चार महिन्यांपासून लडाख सीमेवरील तणाव निवळलेला नाही. चीनचे सैन्य अद्याप पॅगाँग टेक येथून माघारी गेलेले नाही. यावर ‘सीसीटीव्ही’ वृत्तवाहिनीने धक्कादायक वृत्त दिले आहे. हिमालयाच्या परिसरात तिबेटच्या लष्करी भागात गेल्या महिन्यात चीनी सैन्याने क्षेपणास्त्रांसह युद्ध सराव केला आहे.

हिंदुस्थानने पेट्रोलिंग वाढविले

चीनकडून युद्धाची तयारी सुरू आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर लडाख सीमेवर हिंदुस्थानच्या लष्कर अलर्ट असून, येथे पेट्रोलिंग वाढविले आहे. पँगाँग लेक परिसरात पेट्रोलिंगसाठी लहान नौका सज्ज ठेवल्या आहेत.

15 हजार फुटांवर क्षेपणास्त्रांचा युद्धसराव

  • हिमालयाच्या क्षेत्रात तब्बल 15 हजार फुटांवर युद्ध सराव करण्यात आला. येथे मोठय़ा प्रमाणावर सैन्याची जमवाजमव चीनने केली आहे.
  • Howitzer आणि एचजे-10 या अँटी टँक क्षेपणास्त्रांची पहिल्यांदाच या भागात चाचणी करण्यात आली.
  • सहाऐवजी चारचाकी वाहनावर Howitzer ठेवण्यात आले तर एचजे-10 मध्येही चारऐवजी दोन लाँचर ठेवण्यात आले.
  • हिमालयाच्या डोंगराळ भागात या क्षेपणास्त्राची ने-आण करण्यासाठी ही चाचणी घेण्यात आली. डोंगराळ भागात ही शस्त्रास्त्रे घातक ठरू शकतात. हेलिकॉप्टरला टार्गेट करण्याची क्षमता आहे.
आपली प्रतिक्रिया द्या