सिक्कीममध्ये धुमश्चक्री! हिंदुस्थानी लष्कराने चिनी माकडांना फटकावले, 20 सैनिक जखमी

प्रातिनिधिक फोटो

एकीकडे चर्चेचा दिखावा करणाऱ्या चीनच्या माकडांनी पुन्हा हिंदुस्थानच्या हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केला. मात्र लष्कराने पाठलाग करून त्यांना फटकावले. यात चीनचे 20 सैनिक जखमी झाले, तर त्यांचा पाठलाग करताना हिंदुस्थानच्या चार जवानांना दुखापत झाली. सिक्कीमच्या नापुला प्रांतात 20 जानेवारीला ही झटापट झाली, असे लष्कराने सोमवारी सांगितले.

लडाखच्या सीमेवर तणाव कायम असतानाच पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) सैनिकांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न केला. सीमेवरील अलर्ट हिंदुस्थानी जवानांनी त्यांना रोखले. या वेळी चीनी माकडांनी झटापट करून पळ काढला. हिंदुस्थानी जवानांनी पाठलाग करून त्यांना फटकावले. नंतर स्थानिक कमांडर्सनी निर्धारित प्रोटोकॉलचे पालन करीत वाद मिटवला. दरम्यान, झटापटीत हिंदुस्थानचे चार जवान जखमी झाल्याच्या वृत्ताला लष्कराने अजून अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

फ्रंटलाईन सैन्य कमी करण्यास दोन्ही देश तयार

अडीज महिन्यानंतर हिंदुस्थानी लष्कर आणि चीनच्या सैन्यामध्ये रविवारी तब्बल 15 तास मॅरेथॉन बैठक झाली. या वेळी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलएसी) तणाव कमी करण्यासाठी फ्रंटलाईन सैनिकांची संख्या लवकरात लवकर कमी करण्यास दोन्ही देशांनी सहमती दर्शवली. कोअर कमांडर पातळीवर चर्चेची नववी फेरी झाली. मोल्डो परिसरात सकाळी 11 वाजता सुरू झालेली बैठक मध्यरात्री 2.30 च्या सुमारास संपली

आपली प्रतिक्रिया द्या