हेतूशी प्रामाणिक राहा, एससीओ परिषदेत हिंदुस्थानने ठणकावले!

jayshankar

‘‘शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेत हिंदुस्थानचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा मुद्दा उपस्थित केला. एससीओच्या सदस्य देशांनी संघटनेच्या मूळ उद्दिष्टांशी प्रामाणिक राहायला हवे. दहशतवादाच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड करता कामा नये,’’ अशी भूमिका त्यांनी या वेळी मांडली.

एससीओची स्थापना दहशतवाद, फुटीरतावाद आणि कट्टरतावाद या तीन शत्रूंशी लढण्यासाठी झाली होती. विशेष म्हणजे हे तिन्ही शत्रू हातात हात घालून चालतात. त्यामुळे एससीओतील देशांनी आपला मूळ हेतू विसरू नये. परस्पर विश्वासातून प्रादेशिक सहकार्य वाढवण्याची आज नितांत गरज आहे, असे जयशंकर म्हणाले. जून 2020मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर जयशंकर हे पहिल्यांदाच चीन दौऱ्यावर गेले आहेत.