गेल्या 24तासात देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात सर्वात मोठी वाढ, वाचा आजची आकडेवारी

गेल्या 24 तासात देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 66,999 ने वाढला असून एकूण रुग्ण संख्यया 24 लाखांच्या जवळ पोहोचली आहे. ही वाढ आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. गेल्या 24 तासातील मृतांचा आकडाही 942 आहे.

सध्या देशात 23,96,638 कोरोनाग्रस्त आहेत. त्यातील 6,53,622 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर 16,95,982 जणं आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत देशात 47,033 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 8,30,391 कोरोना चाचण्या झाल्या असून 2,68,45,688 चाचण्या झाल्या आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. सध्या देशातील सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात सध्या 1,47,820 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्या पाठोपाठ आंध्रप्रदेशमध्ये 90,425 रुग्ण आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या