चिंताजनक! हिंदुस्थानातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दीड लाखाच्या पार

891

हिंदुस्थानातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दीड लाखाच्या पार गेला आहे. गेल्या 24 तासात देशात 6387 रुग्ण आढळले असून 170 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील कोरोनाग्रस्तांचे आकडे जाहीर केले आहेत.

देशात सध्या 83004 अॅक्टिव्ह कोरोनाग्रस्त असून 64425 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात सर्वाधिक महाराष्ट्रात 54,758 रुग्ण असून 1792जणांचा मृत्यू झाला आहे. त्याखालोखाल 17728 रुग्ण असून 127 जणांचा मृत्यू झाला आहे. तर गुजरातमध्ये सध्या 14821 रुग्ण असून 915 जणांचा मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या