गेल्या 24 तासात आढळले 6566 कोरोनाग्रस्त, 194 जणांचा मृत्यू

955

गेल्या 24 तासात हिंदुस्थानात 6566 कोरोनाग्रस्त आढळले असून 194 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 1,58,333वर पोहोचला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशात 86110 अॅक्टिव्ह कोरोनाग्रस्त असून 67691 कोरोनाग्रस्त बरे झाले आहेत. आतापर्यंत देशात 4531 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात सध्या सर्वाधिक 56,948 कोरोनाग्रस्त आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या