कोरोनामुळे 179 इंजिनीयरिंग, मॅनेजमेंट कॉलेज बंद; 80 हजार जागा घटल्या

384

कोरोनाचा संसर्ग आणि तो रोखण्यासाठी करण्यात आलेला लॉकडाऊन याचा गंभीर परिणाम शिक्षण क्षेत्रावर झाला आहे. देशात अभियांत्रिकी (इंजिनीयरिंग) आणि व्यवस्थापन (मॅनेजमेंट) अभ्यासक्रम शिकवणारी 179 महाविद्यालये बंद पडली आहेत. तसेच काही महाविद्यालयांनी अजूनही एआयसीटीईची मान्यता वाढवून घेतलेली नाही. अशा सुमारे 762 महाविद्यालयांमधील 80 हजार जागा यंदा कमी झाल्या आहेत अशी माहिती अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) दिली आहे.

इंजिनीयरिंग आणि मॅनेजमेंट महाविद्यालयांना गेल्या काही वर्षापासून बऱयाच अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्या महाविद्यालयांमधील हजारो जागा रिक्त राहत आहेत. आधीच अडचणीत असलेल्या या महाविद्यालयांना कोरोनामुळे जबरदस्त फटका बसला आहे. 179 महाविद्यालयांनी 2020-21 या शैक्षणिक वर्षात प्रवेश न करण्याचा निर्णय घेतला आहे तर 134 महाविद्यालयांनी यंदाच्या वर्षी एआयसीटीईची मान्यता वाढवून घेतलेली नाही अशी माहिती एआयसीटीईच्या अहकालात नमूद आहे.

गेल्या नऊ वर्षात महाविद्यालये बंद होण्याची ही सर्वाधिक संख्या असून गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट आहे असे या अहवालात म्हटले आहे. गेल्या पाच वर्षात 30 टक्क्यांपेक्षा कमी जागा भरलेल्या महाविद्यालयांमधील जागा यंदाच्या वर्षी 50 टक्के इतक्या कमी झाल्या आहेत. एकूण 762 महाविद्यालयांमधील 69965 जागा कमी झाल्या आहेत. 44 महाविद्यालयांकर दंडात्मक कारवाई म्हणून एआयसीटीईने यावर्षी त्यांची मान्यता वाढवण्यास नकार दिला आहे. परिणामी तेथील 8832 जागा कमी झाल्या आहेत.

आर्किटेक्चर, फार्मसीलाही धक्का

आर्किटेक्चर आणि फार्मसी महाविद्यालयांमधील जागाही यंदा कमी झाल्या आहेत. कोरोनामुळे त्या कमी झाल्या नसून सर्केच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केल्यानंतर त्या महाविद्यालयांमधील एआयसीटीईची मान्यता असलेल्या जागा कमी झाल्या आहेत. नकी आर्किटेक्चर आणि फार्मसी महाविद्यालये सुरू करण्यासाठी फक्त आर्किटेक्चर कौन्सिल आणि फार्मसी कौन्सिलची मान्यता अनिवार्य असल्याचे आदेश सर्केच्च न्यायालयाने दिले होते.

164 नव्या महाविद्यालयांनी यंदा एआयसीटीईची मंजुरी घेतली आहे. त्यामुळे 40 हजार जागा वाढल्या आहेत. 1300 संस्थांना त्यांच्या विविध अभ्यासक्रमांसाठी जागा वाढवून हव्या आहेत. त्या एकूण 1 लाख 2 हजार जागा आहेत. परंतु पुढील दोन वर्षासाठी कोणत्याही नव्या महाविद्यालयांना परवानगी न देण्याचे धोरण एआयसीटीईने नुकतेच जाहीर केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या