प्रजासत्ताक दिनानिमित्त हिंदुस्थानकडून  नेपाळला रुग्णवाहिका आणि बसेस भेट

373

प्रजासत्ताक दिनानिमित्त हिंदुस्थानने नेपाळला 30 रुग्णवाहिका आणि सहा बसेस भेट म्हणून दिल्या आहेत. या रुग्णवाहिका विविध इस्पतळे, धार्मिक आणि शैक्षणिक संघटनेसाठी वापरल्या जातील. काठमांडूच्या दुतावासात आज प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.

हजारो नेपाळी नागरिकांच्या आरोग्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या विकासासाठी हिंदुस्थानने आतापर्यंत 77 जिल्ह्यात 154 बसेस तर 728 रुग्णवाहिका दान केल्या आहेत. हिंदुस्थानी राजदुतांनी आठ शहीद विधवांना तसेच जवळच्या नातेवाईकांना 5 कोटी 97 लाख रुपयांचा निधी दिला आहे. तसेच हिंदुस्थानी दुतावासाने नेपाळमधील सर्व जिल्ह्यातील वाचनालयाला पुस्तकंही दान केले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या