‘पुढील आदेशापर्यंत’ आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणांवर बंदी वाढवली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विमान वाहतूक नियामक डीजीसीएने सोमवारी सांगितले की, देशातील आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणांचे निलंबन “पुढील आदेशापर्यंत” वाढविण्यात आले आहेत. यापूर्वी 19 जानेवारी रोजी निलंबनाची मुदत 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली होती. कोरोना विषाणू (COVID-19) साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर 23 मार्च 2020 पासून देशात आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणे निलंबित करण्यात आली आहेत. त्यानंतर तयार झालेल्या एअर बबल व्यवस्थेअंतर्गत, जुलै 2020 पासून हिंदुस्थान आणि सुमारे 45 देशांदरम्यान विशेष प्रवासी उड्डाणे सुरू आहेत.

“प्राधिकरणाने पुढील आदेशापर्यंत देशातून नियोजित आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रवासी सेवांचे निलंबन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे,” असे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने सोमवारी एका परिपत्रकात म्हटले आहे. आणि DGCA ने विशेषत: मंजूर केलेल्या उड्डाणांना लागू होणार नाही.

यापूर्वी सरकारी सूत्रांकडून सांगण्यात आले होते की 15 मार्चपासून नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू होऊ शकतात आणि त्यासाठी भारतीय विमानतळांवर प्रभावी मानक कार्यपद्धतीचे पालन केले जाईल. मात्र, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

“प्राधिकरणाने पुढील आदेशापर्यंत हिंदुस्थानातून नियोजित आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रवासी सेवांचे निलंबन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे,” असे नागरि विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) सोमवारी एका परिपत्रकात म्हटले आहे. आणि DGCA ने विशेषत: मंजूर केलेल्या उड्डाणांना लागू होणार नाही.