
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पाकिस्तानने आज सकाळी हिंदुस्थानच्या हवाई हद्दीत शिरण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्याला हिंदुस्थानने प्रत्युत्तर देत त्यांचे एक विमान पाडले. पण या कारवाई दरम्यान हिंदुस्थानचे एक विमान पडले आणि दुर्दैवाने आपला एक वैमानिक बेपत्ता झाला असल्याची माहिती, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार दिली आहे. या वेळी एअर वाईस मार्शल आरजीके कपूर देखील उपस्थित होते.
हिंदुस्थानने पाकिस्तानात शिरून दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. यानंतर पाकिस्तानने आमच्यावर प्रतिहल्ल्याचा प्रयत्न केला. आमच्या दक्षतेमुळे आम्ही त्यांना परतवून लावले. तसेच पाकिस्तानचे एक लढाऊ विमान पाडले. ते त्यांच्याच हद्दीत पडले. दरम्यान, आमचं एक मिग 21 विमान पडलं. दुर्दैवाने त्यातील एक वैमानिक बेपत्ता आहे. पाकिस्तानने हिंदुस्थानचा एक वैमानिक पकडल्याचा दावा केला. त्यासंदर्भात आम्ही तपास करत आहोत, असे रवीश कुमार यांनी सांगितले.

























































