370 वर सौदीचा हिंदुस्थानला पाठिंबा

737

 जम्मू-कश्मीरबाबत हिंदुस्थानने घेतलेला निर्णय आम्ही समजू शकतो, अशी भूमिका घेत सौदी अरेबियाच्या क्राऊन प्रिन्स यांनी 370 कलमावरून हिंदुस्थानला पाठिंबाच दिला आहे. सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असलेले हिंदुस्थानचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज बुधवारी क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेतली. सुमारे दोन तास बैठक चालली. या बैठकीत सौदीची कश्मीरबद्दलची भूमिकाही समजावून सांगण्यात आली. दरम्यान, डोवाल यांनी अबुधाबीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बीन झायेद अल नाहयान यांचीही भेट घेतली. जम्मू-कश्मीरमधून 370 कलम का हटवले याबाबतची हिंदुस्थानची भूमिका पटवून देण्यासाठी हिंदुस्थानने सौदी अरेबियाच्या सर्वोच्च नेतृत्वाशी चर्चा केली. द्वीपक्षीय हिताच्या आणि महत्वाच्या विषयांवर या बैठकीत चर्चा झाली.

आपली प्रतिक्रिया द्या