
हिंदुस्थानच्या एकूण आयातीपैकी 40 टक्के आयात होर्मुझ मार्गावरून होते. हा मार्ग बंद झाल्यामुळे हिंदुस्थानला फटका बसणार आहे. कच्च्या तेलाचा 18 ते 19 दिवसांचा साठा हिंदुस्थानकडे असला तरी एलपीजी आणि एलएनजीच्या बाबतीत तशी स्थिती नाही. त्यामुळे युद्ध लांबल्यास एलपीजी व एलएनजीचा तुटवडा निर्माण होण्याची भीती आहे. तुटवड्यामुळे दर वाढून महागाईचा भडका उडण्याचीही शक्यता आहे.




























































