हिंदुस्थान म्यानमारच्या संयुक्त कारवाईत फुटीरवाद्यांचे तळ उध्वस्त

28

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थान आणि म्यानमारने संयुक्त कारवाई करून ईशान्येकडील फुटीरवाद्यांची तळ उध्वस्तं केली आहेत. दोन्ही देशाच्या सैन्यांनी आपपल्या देशाच्या सीमेवर ही कारवाई केली आहे. तसेच या कारवाईदरम्यान काही फुटीरतवाद्यांनाही अटक करण्यात आली आहे.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार हिंदुस्थानी सैन्याने या मोहीमेला ‘ऑपरेशन सनशाईन-2’ असे नाव दिले आहे. हिंदुस्थानी हद्दीत सैन्याच्या दोन बटालियन, विशेष सुरक्षा दल आणि आसाम रायफल्सच्या जवानांनी ही कारवाई केली. तर म्यानमारचे चार ब्रिगेडने फुटीरवाद्यांचे तळ उध्वस्त केले.

यापूर्वी 22 ते 26 फेब्रुवारी दरम्यान हिंदुस्थानी सैन्याने ऑपरेशन सनशाईन-1 चालवले होते. तेव्हा सैन्याने संशयित फुटीरतवाद्यांचे तळ उध्वस्त केले होते. तसेच अनेक फुटीरवाद्यांच्या मुसक्याही आवळल्या होत्या.

ऑपेरशन सनशाइन-2 मध्ये हिंदुस्थानी सैन्याने 70 ते 80 फुटीरवाद्यांना पकडले आहे. त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले असून सैन्याने सात ते आठ कॅम्प उध्वस्त केल्याचे सांगितले जाते. हे कॅम्प नागालँड व उल्फा, एनईएफटी या फुटीरवादी संघटनेचे होते.

आपली प्रतिक्रिया द्या